खान्देश चा सरपंच वृत्तसेवा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत आहे. पार्थ पवारांनी कोरेगाव पार्क येथील बाजारभाव १८०० कोटींची असलेली जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी आरोप-प्रत्यारोपांच्या चौथऱ्यावर उभे केले असताना अशातच भाजपचे माजी खासदार तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भूखंडाचा मोठा आरोप केला आहे. सोबतच आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही गौण खनिज चोरीचा आरोप केला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *