खान्देश चा सरपंच वृत्तसेवा :

पाचोरा – भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणातून प्रशासनावर थेट टीका करत शेतकऱ्यांचा ज्वलंत मुद्दा उपस्थित केला.

चव्हाण म्हणाले की, “पाचोरा तालुक्यात संपूर्ण सरसकट जिरायत लावल्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल 35 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासन काय करत होते? स्थानिक आमदार काय करत होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्या या भाषणानंतर प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून विहीर असलेल्या शेतकऱ्यांना बागायत जमिनीचा पंचनामा करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *