खान्देश वृत्तसेवा विशेष:
पारोळा-एरंडोल मतदारसंघ हा खान्देशच्या राजकारणातील सर्वाधिक गाजलेला परिसर मानला जातो. येथे प्रत्येक निवडणूक ही केवळ मतदानाची लढाई नसून, प्रतिष्ठेची कसोटी असते.माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी आमदार डॉ. सतिश पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, लोकसभा गाजवणारे करण पवार, तसेच डॉ. संभाजी राजे पाटील, नाना महाजन आणि भगवान महाजन यांसारख्या पारोळा-एरंडोल च्या दिग्गजांची ही यादी खुप मोठी आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सामर्थ्य दाखवण्याची संधीही तेवढीच मोठी आहे. या सर्व नेत्यांनी आपल्या काळात जनतेशी जिव्हाळ्याचं नातं जोडत राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण काळ बदलतो तसं समीकरणही बदलतं. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा सत्तेचा पाया ठरू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंत सत्ता टिकवणे, पक्षाचं वर्चस्व वाढवणे आणि नव्या पिढीतील नेतृत्वाला संधी देणे — या तिहेरी संघर्षात पारोळा-एरंडोलचं राजकारण अधिकच रंगतदार बनलं आहे.खऱ्या अर्थाने आता हा काळ ‘जनतेचा’ आणि ‘जनभावनेचा’ ठरणार आहे. कारण दिग्गजांची सावली जरी मोठी असली, तरी नव्या नेतृत्वाची कळी उमलण्याची हीच वेळ आहे.—✍️ खान्देश चा सरपंच वृत्तसेवा#पारोळा_एरंडोल #राजकारण #खान्देशचा_सर्पंच #लोकसत्ता #स्थानिक_स्वराज्य
खान्देश चा सरपंच वृत्तसेवा :

