पाचोरामध्ये भाजपचा “भव्य परिवर्तन मेळावा”; किशोर पाटील यांच्या निर्धाराला पलटवार?आपण सर्वांनी आमदार किशोर आप्पांचा निर्धार मेळावा पाहिला — ज्याची चर्चा केवळ खान्देशातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर झाली होती. त्यांच्या दमदार भाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आणि कदाचित या निर्धाराला पलटवार म्हणुनच भाजपकडून आता पाचोऱ्यात “भव्य परिवर्तन मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा येत्या ५ नोव्हेंबर रोजी (बुधवार) सकाळी १० वाजता पाचोऱ्याच्या सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे पार पडणार आहे. या मेळाव्याद्वारे भाजप स्थानिक तसेच जिल्हास्तरावर आपली राजकीय पकड पुन्हा मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते.या परिवर्तन मेळाव्याचे अध्यक्षस्थान जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ भूषवणार असून, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात मा.आ.दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशालीताई सुर्यवंशी यांच्या कशाप्रकारे व्यक्त होतात याकडे खान्देशाचे लक्ष लागले आहे.आमदार मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून येत आहे.दरम्यान, आयोजकांच्या माहितीनुसार हा कार्यक्रम भाजपचा “परिवर्तनाचा शंखनाद” ठरेल. यातून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पक्षाने आपली रणनीती आणि संघटनशक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल.कार्यक्रमाचे आयोजक दिपक माने, गोविंद शेलार व शोभाताई तेली यांनी आवाहन केले आहे की, पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.1
