- पाचोऱ्यात भगव्या लाटेचा जल्लोष…
- समोर तीन जण तरीही आमदारांचे पारडे जड….
पाचोरा (खा.स.वृत्तसेवा) :
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सौ. सुनिता किशोर पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित किशोर पाटील यांनी आज कैलादेवी मंदिर येथे देवीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला.
या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा भडगाव शिवसेना कार्यकारणी उपस्थित होती.
भक्तिभावाने नाळ फोडून कैलादेवी चरणी प्रार्थना करत पाटील परिवाराने प्रचाराला शुभ प्रारंभ केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि भगव्या पताकांच्या फडक्यात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणांनी स्वागत करत विजयासाठी प्रचंड आगाज केला.
या वेळी शिवसेना (शिंदे गट), युवा सेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शिवसेनेच्या विजयी घोषणा गुंजत होत्या.
सौ. सुनिता किशोर पाटील या पाचोऱ्याच्या माजी नगराध्यक्षा देखील आहेत. त्यामुळे त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. तसेच पती आमदार तसेच मुलगा सुमित पाटील सक्रिय राजकारणात सहभागी असल्याने युवावर्ग देखील प्रचंड सोबत आहे. त्यातच सत्तेचे वलय असल्याने त्यांच पारड जड आहे. परंतु यावेळी समोर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघांचे तगड आव्हान असल्याने
ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
